देश समृद्ध होण्यासाठी दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था अधिक बळकट झाल्या पाहिजेत…


सिंधुदुर्ग महाविदयालयाच्या हीरक महोत्सव समारोप सोहळ्यात खा. नारायण राणे यांचे प्रतिपादन
खा. नारायण राणे यांच्या उतुंग कार्यकर्तृत्वाचे संस्थाध्यक्ष किरण ठाकुर यांनी केले कौतुक

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. जनहिताच्या अनेक योजना राबवल्या जात आहे. देशाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक समृद्धी महत्वपूर्ण असून शासन त्यासाठीही प्रयत्नाशील आहे. शैक्षणिक समृद्धीतून दरडोई उत्पन्न वाढेल. आपला देश समृद्ध होईल. म्हणूनच दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था अधिक बळकट झाल्या पाहिजेत. यासाठी आपले योगदान यापुढेही कायम राहील. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मालवण येथे बोलताना केले.

दरम्यान, जगात कोकणातील बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे. असे सांगत खा. नारायण राणे यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचे संस्थाध्यक्ष किरण ठाकुर यांनी विशेष कौतुक केले. सोबतच विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हीरक महोत्सव समारोप सोहळा खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. समारंभाचे उद्घाटन खास. नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कृ. सि. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, चेंबर ऑफ कॉमर्स उपाध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक परब-मुळीक, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तहसीलदार वर्षा झालटे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. शशिकांत झाट्ये, संस्था सचिव गणेश कुशे, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुधीर धुरी, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, सुदेश आचरेकर, उमेश नेरुरकर, ऍड. समीर गवाणकर, साईनाथ चव्हाण, भाऊ सामंत, सेवानिवृत्त नेव्हल कमांडर राजीव कुबल, ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडर ऑफिसर दीपक दयाळ, कमांडर तनुज मंडलिक आदी व इतर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वाटचालीच्या व्हिडिओ डॉक्युमेंट्रीचे प्रसारण एलईडी स्क्रीनवर संस्था पदाधिकारी भाऊ सामंत यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी केले.
महाविद्यालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या बास्केटबॉल मैदानाचे उद्घाटन खास. नारायण राणे यांच्या हस्ते तसेच महाविद्यालयाच्या नूतन विस्तारित नामफलकाचे अनावरण किरण ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे १९६५ पासून ते आजतागायतचे सर्व विद्यापीठ प्रतिनिधी UR, जनरल सेक्रेटरी GS, विद्यार्थिनी प्रतिनिधी LR, सेवानिवृत्त प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. तर मुख्य कार्यक्रमात महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षामध्ये विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान खास. राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खास. नारायण राणे म्हणाले, स. का. सिंधुदुर्ग महाविद्यालयाला ज्या काही कमतरता जाणवत असतील, अडचणी असतील तसेच ज्या शैक्षणिक सुविधा आवश्यक असतील त्याचा आराखडा तयार करून संस्था पदाधिकाऱ्यांनी माझी भेट घेऊन सादर करावा, तसेच शैक्षणिक दृष्ट्या ज्या परवानगी आवश्यक असतील त्याचे पत्र मला आणून द्यावे, मी परवानगी मिळवून देईन, असेही खास. नारायण राणे म्हणाले.
यावेळी उद्योजक डॉ. दीपक परब म्हणाले, सिंधुदुर्ग कॉलेज हे आमच्यासाठी गुरुकुल आहे, इथे जे शिकलो त्यामुळेच आज उद्योजक म्हणून कार्यरत आहे. आपल्या कॉलेजला माजी विद्यार्थ्यांनी विसरू नये, असे सांगत डॉ. दीपक परब यांनी कॉलेज आठवणीणा उजाळा दिला. विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अतुल काळसेकर म्हणाले, सिंधुदुर्ग कॉलेजशी माझ्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत, तशाच आठवणी माजी विद्यार्थ्यांच्या आहेत, हीच आठवण ठेवून माजी विद्यार्थी आज एकत्र आलेत हि अभिनंदनीय गोष्ट आहे, असे सांगितले. यावेळी राजीव कुबल यांनी आर्टिफिशियल इंटिलिजेंट या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय केनवडेकर यांनी केले तर आभार डॉ. सुमेधा नाईक यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने आजी माजी विद्यार्थी, शिक्षक वर्ग, कर्मचारी व इतर उपस्थित होते.
सायंकाळी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न झाले. यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य, गायन, व इतर कलागुणदर्शन कार्यक्रम सादर करत आपल्या जुन्या कॉलेजवयीन आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित होते.

