अतिरेक्यांना गोळ्या घाला, पाकिस्तानला समुद्रात बुडवा…


पारंपरिक मच्छीमारांनी केला अतिरेकी हल्ल्याचा निषेध
मालवण : श्रमिक मच्छीमार संघटना सिंधुदुर्गच्या वतीने जम्मू काश्मीरच्या पहलगाम बैसरन घाटीमध्ये झालेल्या पर्यटक हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी यांच्या प्रतिकृती पायाखाली तुडवून रविवारी निषेध करण्यात आला. तसेच मालवण दांडी किनारी सर्वांनी एकत्र जमून पाकिस्तान मुर्दाबाद, अतिरेक्यांना गोळ्या घाला ..पाकिस्तानला समुद्रात बुडवा अशा घोषणा दिल्या. तसेच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी रश्मिन रोगे, सन्मेष परब, लिओ काळसेकर, प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, गणेश चव्हाण, श्रीराज बादेकर, भाई जाधव, महेश कोयंडे, विशाल आचरेकर, सुजित मोंडकर, वसंत गावकर, रणजीत खवणेकर, योगेश पराडकर, प्रवीण कुबल, विठोबा केळुसकर, सुजित खवणेकर, बाबी जोगी, रविकिरण तोरसकर तसेच बजरंग दल मालवण यांचा सहभाग होता.

