सिंधुदुर्ग विमानतळावरून १८ एप्रिल पासून मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमानसेवा सुरु होणार

खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश ; अलायन्स कंपनी बरोबरच इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु

नवी दिल्ली : परुळे चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळा वरून येत्या १८ एप्रिल पासून एअर अलायन्सची मुंबई सिंधुदुर्ग- मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत. एअर अलायन्स बरोबरच इंडीगो विमान कंपनीची सेवा सुरू करण्याबाबत युध्द पातळीवर प्रयत्न सुरु असल्याची माहीती खा. नारायण राणे यांनी दिली. अलीकडेच नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल असे माजी केंद्रीय मंत्री, खा. नारायण राणे यांना आश्वासीत केले होते. गेल्याच आठवड्यापासून सिंधुदुर्ग- पुणे विमान वाहतुक सुरुही झाली आहे.

गेले काही महिने चिपी ते मुंबई ही नियमित सुरु असलेली सेवा बंद झाली होती. ही सेवा पुनः मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सेवा सुरु करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे यासाठी खा. नारायण राणे आग्रही होते. त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्वाची आहे, तसेच विमानतळावरील अन्य सेवा, सुविधा, समस्या यांकडे लक्ष वेधले होते. यानंतर वेगाने कार्यवाही होत सिंधुदुर्ग विमानतळावरील अनेक सेवा सुविधा अपडेट करण्यात येत आहेत. यामुळे येत्या १८ एप्रील पासून मुंबई-चिपी-मुंबई ही एअर अलायन्सची विमान सेवा दर शुक्रवारी सुरु होणा याबरोबरच इंडिगो या कंपनीचा विमान सेवा मार्ग लवकरच जाहीर केला जाणार आहे. काही तांत्रिक त्रुटी दुर केल्यानंतर त्याची माहीती जाहीर होईल. असे खा. नारायण राणे म्हणाले. पुणे- सिंधुदुर्ग – पुणे ही सेवा गेल्याच आठवड्यापासून सुरु झाली आहे.

अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्गा-मुंबई दरम्यान उड्डाणे सुरू केली. त्याचा कालावधी ३ वर्षांचा होता, जो ऑक्टोबर २०२४ मध्ये संपला. उड्डाण सेवा थांबवल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाइन वापरकर्त्यांवर वाईट परिणाम झाला आहे. मुंबई ते चिपी सेवा कार्यान्वित असताना पर्यटकांना, जिल्हावासीयांना मोठा लाभ होत होता. सणासुदीच्या काळात, हवाई मेळा रु. २५,०००/-पर्यंत वाढायचा. एका मार्गासाठी. कधीकधी अप्रत्याशिततेचा एअरलाइन वापरकर्त्यांवर परिणाम झाला, परंतु फ्लाइट नेहमीच बुक केल्या गेल्या. पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारी उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गासाठी आरसीएस आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी, सिंधुदुर्गासाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करावी. अशी भुमिका खा. राणे यांनी स्पष्ट केली आहे

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4193

Leave a Reply

error: Content is protected !!