दत्ता सामंत यांचा झंझावात कायम ; श्रावण गावात उबाठाला धक्का
देवबाग गावातील नाना तांडेल देखील शिवसेनेत ; महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या सहकार्यातून विकासात्मक प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा झंझावात कायम आहे. मालवण तालुक्यातील श्रावण गावात दत्ता सामंत यांनी उबाठा शिवसेनेला धक्का दिला असून येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर देवबाग गावातील नाना तांडेल यांनी देखिल दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
श्रावण गावातील प्रवेशकर्त्यांमध्ये संतोष परब, कृष्णा परब, भाई परब, बंड्या परब, संकित परब, साई परब, वेदांत परब, श्री. परब, सुमित परब, दिलीप राणे, नारायण मालप, मंगेश दळवी, यश चव्हाण, दीपक चव्हाण, शंकर सावंत, समीर सडेकर, प्रथमेश सावंत, विजय सावंत यांचा समावेश आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख महेश राणे, राजेश हाटले, निलेश बाईत यांच्यासह गावातील भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, देवबाग गावातील नाना तांडेल यांनी देखील दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी दाजी सावजी, मंदार लुडबे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.