पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कुडाळ मालवण मतदार संघात ३८६४ घरकुल मंजूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह खा. नारायण राणे, आमदार निलेश राणे यांचे नागरिकांनी मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत सिंधुदुर्गात २०२४-२५ साठी तब्बल ११ हजार ८८१ घरकुले मंजूर झाली आहेत. यामध्ये कुडाळ मालवण मतदार संघात ३८६४ घरकुले मंजूर झाली आहेत. याबद्दल येथील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह यासाठी पाठपुरावा करणाऱ्या खासदार नारायण राणे, कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका आर्थिक वर्षात एवढ्या संख्येने प्रथमच घरकुले मंजूर झाल्याने या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून १७८ कोटी २१ लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त होणार आहेत. यात कुडाळ तालुक्यात एकूण २८५७ तर मालवण तालुक्यात १००७ घरकूल मंजूर झाली आहेत.