मालवण तालुक्यात शिवसेनेचा उबाठाला मोठा धक्का ; तोंडवळी सरपंच कार्यकर्त्यांसह शिवसेनेत !
महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश
ग्रा. पं. सदस्यासह युवासेना शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांचा देखील प्रवेश : शिवसेना उपनेते संजय आग्रे यांचीही प्रमुख उपस्थिती
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात उबाठा गटाला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. महायुतीचे उमेदवार निलेशजी राणे, शिवसेना पक्षाचे उपनेते संजय आग्रे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या उपस्थितीतीत तोंडवळी येथे उबाठा सेनेच्या तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, सदस्या अनन्या पाटील तसेच तोंडवळी युवासेना शाखाप्रमुख राजा पेडणेकर तसेच अन्य उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला
यावेळी शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, माजी सभापती नीलिमा सावंत, संतोष कोदे, मंगेश गावकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, अभिजित सावंत, मनोज हडकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.