अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या उद्धव ठाकरेंवर कारवाई करा : भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे
निवडणूक आयोगाचे नियम सर्वच लोकप्रतिनिधीना लागतात, ठाकरेंनाही ते लागतात, थयथयाट कशाला करता ?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही बॅग तपासली त्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य केले
कणकवली : निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे अपॉइंटमेंट लेटर मागणाऱ्या उद्धव ठाकरेंवर कारवाई व्हायला हवी. निवडणूक आचारसंहिता काळात सर्व नेत्यांच्या बॅग तपासल्या जातात. मग उद्धव ठाकरेंची नाटके, थयथयाट कशाला ? जो नियम अन्य लोकप्रतिनिधीना लागतो तोच ठाकरेंना लागतो. काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचीही बॅग तपासली. पण फडणवीस यांनी थयथयाट केला नाही. उद्धव ठाकरे काल निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमकावत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या उद्धव ठाकरेंवर कारवाई करा अशी मागणी भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली नाही असे निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार हे भ्रष्टाचारी होते. उद्धव ठाकरे हे श्री 420 आहेत.उद्धव ठाकरे सह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बुरखा या अहवालाने फाडला आहे. त्यावर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आपले तोंड उघडावे असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले.