कणकवली हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील मुस्लिम समाजाच्या असंख्य महिला कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश

कणकवली विधानसभा निवडणुकीत आमदार नितेश राणे यांना पाठिंबा

कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुल बुद्रुक शेखवाडी येथील उबाठा गटाच्या आसमा पटेल, नसरीन इमरान शेख, रसाई उमर शेख, अबिदा नासिर पटेल, रशिदा बशीर पटेल, शांताबाई दशरथ पवार, सायली धुतरे, शबाना पठाण अशा महिला कार्यकर्त्यानी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणतीही विकासकामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तुत्वावर प्रभावित होऊन  भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून हरकुळ गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करत्या महिला प्रतिनिधींनी सांगितले. यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासोबत गोट्या सावंत, इम्रान शेख, राजू पेडणेकर, बुलंद पटेल, जाहीर खान आदी भाजप उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3813

Leave a Reply

error: Content is protected !!