दत्ता सामंत यांचा उबाठाला धक्का ; बांदिवडे सरपंच आशु मयेकर सहकाऱ्यांसह शिवसेनेत दाखल
खा. नारायण राणे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ; निलेश राणे यांच्या माध्यमातून गावचा गतिमान विकास होण्याच्या विश्वासातून शिवसेनेत प्रवेश – आशु मयेकर
मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. रविवारी सायंकाळी तेंडोली गावातील उबाठाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर मालवण तालुक्यातील बांदिवडे गावचे उबाठा सरपंच तथा ठाकरे युवासेना उपतालुकाप्रमुख आशु मयेकर यांसह माजी सदस्य लीलाधर मुणगेकर, युवासेनेचे विकास आचरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गावात विकासकामांना प्राधान्य मिळण्यासाठी, महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे यांच्या माध्यमातून अधिक गतीने गावचा विकास होणार असल्याच्या विश्वासातून शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे सरपंच आशु मयेकर यांनी सांगितले.
यावेळी खासदार नारायण राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख महेश राणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, बाबू परब, सचिन पाटकर, मंदार लुडबे, महेश पेडणेकर, ओंकार पेडणेकर, भाऊ मोरजे, राहुल परब यांसह अन्य उपस्थित होते.