मालवण मधील मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश
माजी आमदार परशुराम उपरकर यांची उपस्थिती
मालवण : मालवण मधील मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी आज माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यामध्ये हर्षद परब, सागर वराडकर, भारती वाघ, भागेश्री लाकडे, मनुजा वारंग, रेणुका लाड, कुणाल धुरत, सिद्धेश घोगळे आदींचा समावेश आहे. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, विनोद सांडव, अमित भोगले, निनाक्षी मेथर आदिंसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.