ठाकरे शिवसेनेच्या मालडी शाखाप्रमुखपदी श्रीकांत खोत ; तर उपशाखाप्रमुखपदी प्रथमेश पराडकर

आ. वैभव नाईक यांना गावातून ९० टक्के मतदान देण्याचा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा निर्धार

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालडी शाखाप्रमुखपदी श्रीकांत खोत तर उपशाखाप्रमुखपदी प्रथमेश पराडकर यांची निवड  करण्यात आली आहे. आज कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 

यावेळी श्रीकांत खोत व प्रथमेश पराडकर यांनी मालडी गावातील शिवसेना संघटना वाढीसाठी आपण प्रयत्न करून आ.वैभव नाईक यांना येणाऱ्या विधानसभेत मालडी गावातून ९० टक्के मतदान देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी अरुण लाड, नितीन पवार, अरविंद साटम, विठ्ठल घाडी, महेश पराडकर, आडवली-माडली युवासेना शाखाप्रमुख प्रविण सावंत, नितीन पवार, प्रविण परब,  लक्ष्मण घाडी, कैलास घाडी, नरेश सावंत, विलास पराडकर, सुभाष पराडकर, तुषार पराडकर, गणेश पराडकर, सुशील पराडकर, हर्ष पराडकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!