आ. नितेश राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गावागावातून जनसागर कणकवली दाखल
थोड्यावेळातच श्रीदेव गांगो मंदिर येथून भव्य रॅली उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होणार रवाना
भाजप व महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत होणार जाहीर सभा
कणकवली : भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून आमदार नितेश नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. आ. राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करत असून सकाळपासूनच मतदार संघातील जनता मोठ्या प्रमाणात कणकवली शहरात दाखल होऊ लागली आहे. सर्वच भागातून हा उस्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. मिळेल ते वाहन पकडून जनता कणकवली शहराकडे येत आहे.
सकाळपासूनच गावागावातील भाजप कार्यकर्ते आणि जनता कणकवलीला येऊ लागली.आणि काही वेळातच कणकवली गांगो मंदिर परिसर जनसागराने फुलून गेला. कार्यकर्त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. काही वेळातच ढोल पथकांच्या गजरात आमदार नितेश राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कणकवली गंगो मंदिर येथून माजी मंत्री नारायणराव राणे, मंत्री रविंद्र चव्हाण,मंत्री दीपक केसरकर,मंत्री विश्वजित राणे,श्री.निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थिती प्रांत कार्यालयापर्यंत भव्य रॅली सुरू होणार आहे. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे.