आरक्षित ओबीसी समाज महासंघाच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी रविकिरण तोरसकर

मालवण : आरक्षित व ओबीसी समाज महासंघाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी रविकिरण तोरसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती महासंघाचे पदाधिकारी नितीन वाळके, नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली. 

आरक्षित व ओबीसी समाज महासंघ सिंधुदुर्ग ही संघटना सिंधुदुर्गातील ओबीसी व आरक्षित समाजाच्या हितासाठी आणि हक्कांसाठी कार्यरत आहे. आजमीतीस सिंधुदुर्गातील जवळपास सर्व धर्मातील साठच्या आसपास समाज महासंघाशी निगडित आहेत. आरक्षित व ओबीसी समाजाला राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्र, प्रशासन यामध्ये न्याय वाटा मिळावा या दृष्टिकोनातून महासंघ कार्यरत आहे. महासंघ आपल्या कार्याचा विस्तार तसेच समाज बांधवांना त्यांच्या हक्का संदर्भात जनजागृती करण्यासाठी संघटनात्मक बांधणी करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या संघटनात्मक बांधणीमध्ये आपला सहभाग असावा असे महासंघास वाटत आहे. महासंघाच्या कार्याचा विस्तार मालवण तालुक्यामध्ये करण्यासाठी महासंघाच्या कार्यकारिणीने आपल्याशी झालेल्या चर्चेनंतर, आपली निवड मालवण तालुक्याच्या तालुकाध्यक्षपदी केली आहे. आपण महासंघाची सोपवलेली जबाबदारी  प्रामाणिकपणे पार पाडाल याबद्दल महासंघास खात्री आहे. पुढील तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तालुका, पंचायत समिती, जिल्हा परिषद गट, कार्यकारणी तसेच गाव पातळीवरील कार्यकारणी आपल्या अध्यक्षतेखाली व महासंघाच्या महासंघाच्या मार्गदर्शना अंतर्गत बनविणे अपेक्षित आहे. आपल्याला नियुक्ती बद्दल आणि पुढील वाटचालीसाठी महासंघाच्या शुभेच्छा असे श्री. तोरसकर यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

२४ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी नंदन वेंगुर्लेकर, रमण वायंगणकर, सुनील भोगटे, काका कुडाळकर, दिपलक्ष्मी पडते, महेश परुळेकर, चंद्रकांत कुंभार आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!