खोटले ग्रामपंचायत इमारतीसाठी २० लाख रुपयांचा निधी ; आ. वैभव नाईक यांची शब्दपूर्ती
खोटले सरपंच सुशील परब यांनी मानले आभार
मालवण : मालवण तालुक्यातील खोटले येथील ग्रामपंचायत कार्यालय अतिशय जीर्ण झाल्यामुळे ग्रामपंचायत इमारत केंद्र शाळा खोटले येथे तात्पुरत्या स्वरुपात हलवण्यात आली आहे. ग्रा. पं. ला कायमस्वरूपी सुसज्ज इमारत मिळावी अशी मागणी खोटले ग्रामस्थां मधून करण्यात येत होती. याबाबत खोटले सरपंच सुशिल परब, उद्योजक आशिष परब आणि ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी केली होती. त्यावेळी आमदार वैभव नाईक यांनी खोटले ग्रामपंचायत साठी आवश्यक निधी मंजूर करण्याचा शब्द दिला होता. आ. वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला असून जनसुविधा जिल्हावार्षिक योजनेतून तब्बल २० लाख रु. निधी खोटले ग्रामपंचायतसाठी मंजूर करून दिला आहे. याठिकाणी लवकर प्रशस्त अशी इमारत उभी राहणार आहे. त्याबद्दल सरपंच सुशिल परब, ग्रा.प. सदस्य, शिवसेना शाखाप्रमुख, शिवसैनिक व ग्रामस्थांनी आभार मानत आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार केला आहे.