देऊळवाडा रामेश्वर मंदिर ते नारायण मंदिर पेवर्स ब्लॉक बसवण्याच्या कामाचा भाजपाकडून शुभारंभ
खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने निधी : दीपक पाटकर यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
शहरातील देऊळवाडा रामेश्वर मंदिर ते नारायण मंदिर रस्त्यावर पेवर्स ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांच्या माध्यमातून हा निधी मिळाला असून या कामासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर व दीपक पाटकर यांनी पाठपुरावा केला. या भूमिपूजन प्रसंगी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, संतोष इब्रामपूरकर, शुभा मालवणकर, नामदेव घाडी, बाळा घाडी, सौ. केळूसकर, सौ। सुजा घाडी, रवी मालवणकर, शरद गावकर, सुधीर मराळ, जितू मराळ, लौकिक मराळ, बाळू डिचोलकर, पांड्या फणसेकर, नाना घाडी, बाबू मालवणकर, शिवाजी म्हापणकर, बबली आंब्रडकर, संदेश वाळके, जितू वाळके, शेखर केळूसकर, कार्तिक घाडी, राहुल केळूसकर, गोपी मालवणकर, आबा हडकर, सूर्यकांत फणसेकर, संदेश चव्हाण, भूषण राऊळ, श्री. मालवणकर, श्री. चव्हाण, मुन्ना फाटक, बाळा फाटक, श्री. रानडे, समीर वर्दम, महेश गावकर, दशरथ वालावलकर, श्री. नेरकर, संतोष केरकर, कमा गावकर, भूषण म्हापणकर आदी उपस्थित होते.