रेवतळे फाटक शाळा छप्पर नूतनीकरणासाठी ४.६६ लाखांचा निधी
माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा पाठपुरावा ; खा. नारायण राणे, ना. रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंचे मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर अंतर्गत रेवतळे फाटक शाळेचे छप्पर नूतनीकरण करणे या कामासाठी ४ लाख ६६ हजार ९९१ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी पाठपुरावा केला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा निधी मिळाला असून याबाबत श्री. पाटकर यांनी आभार मानले आहेत.
या कामाचे भूमिपूजन दीपक पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, बाबू वायंगणकर, राजन बादेकर, शिक्षक महादेव घोडके, सुभाष मिठबावकर, राजा मांजरेकर, भालचंद्र राऊत, पंकज पेडणेकर, माजी नगराध्यक्षा अर्चना मिठबावकर, कॅलिस फर्नांडिस, टेलेस डिसोझा, सूरज भगत, बाबू शिंदे, प्रतीक परब, महेश मांजरेकर, धनंजय मिठबावकर, प्रदीप मांजरेकर, प्रसन्ना कांबळी, परशुराम पाटकर आदी उपस्थित होते.