महायुती व आरपीआयची उद्या (शनिवारी) कणकवलीत संविधान बचाव रॅली

आरक्षित समाज मोठ्या संख्येने होणार सहभागी ; जानवली ब्रीज ते कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी निघणार रॅली 

कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे तो संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे  माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केलेला आहे. आरक्षण हा आमचा हक्क असून आम्ही आरक्षण संपवू देणार नाही. शनिवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथे कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील नागरिकांची भव्य आरक्षण बचाव रॅली काढली जाणार आहे. जानवली येथील नदी पुलावरून ही रॅली निघणार आहे, अशी माहिती अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी दिली.

राहुल गांधी यांनी केलेल्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ ही रॅली निघणार आहे. संविधानाने अनुसूचित जाती जमाती सह इतर प्रवर्गाला आरक्षणाचा हक्क दिलेला आहे. आमच्या हक्काचे आरक्षण काँग्रेसला हिसकावू देणार नाही. यासाठी कणकवली शहरात आरक्षण बचाव रॅली निघणार आहे. ही रॅली ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जानवली पुलाकडून सुरू होणार आहे. त्यांनतर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून  छत्रपती शिवाजी महाराज चौकात संविधान बचाव रॅलीचे सभेत रूपांतर होणार आहे.त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. राहुल गांधींची प्रवृत्ती आणि विचारांना विरोध करण्यासाठी आरक्षण बचाव रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे. आरक्षण हा आपल्या प्रत्येकाचा अधिकार असून तो हिसकावून घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला कडाडून विरोध करायचा आहे. म्हणूनच सर्व नागरिकांनी एकत्रित येत या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!