VIDEO | वायरीत वस्तीत शिरलेल्या अजगराला जीवदान 

वस्तीत आलेल्या साप, अजगरांना हानी न पोहोचवता जीवदान द्या  : सौ. रूपा कुडाळकर यांचे आवाहन

मालवण : शहरातील वायरी येथे पर्यावरण प्रेमी राजेश रामनाथ कुडाळकर व सौ. रूपा राजेश कुडाळकर यांच्या अंगणात आलेल्या भल्यामोठ्या अजगराला सर्पमित्र आनंद बांबर्डेकर यांच्या माध्यमातून पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. दरम्यान, साप, अजगर हे आपले शत्रू नाहीत. त्यामुळे परिसरात कुठेही ते दिसून आल्यास त्यांना न मारता सर्पमित्रांना बोलावून जीवदान देण्याचे आवाहन सौ. कुडाळकर यांनी केले आहे. गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा अजगर दिसून आल्यानंतर कुडाळकर यांनी सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या माध्यमातून सर्पमित्र आनंद बांबर्डेकर यांना पाचारण केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!