पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून खा. नारायण राणे यांच्याकडून १६.२९ कोटींचा निधी 

सिंधुदुर्गातील सहा महत्त्वाचे रस्ते मंजूर ; खा. नारायण राणे यांच्या शिफारसीनंतर तातडीने निधी प्राप्त

कणकवली : पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी शिफारस केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा कामांना १६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अनेक ग्रामीण भागाला जाण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था नव्हती. या रस्त्यांमुळे अनेक गाव एका दुसऱ्याला थेट जोडले जाणार आहेत.

यात मजूर रस्ते पुढील प्रमाणे आहेत, धालवली फणसगाव रोड तालुका देवगड, साठी ३ कोटी ७४ लाख, पडवणे पालये वाडातर तालुका देवगड, रस्त्यासाठी ३ कोटी ९६ लाख, नेतर्डे डोंगरपाल फकीरफाटा रस्ता तालुका सावंतवाडी, १ कोट ६०,आजगाव तिरोडा  तालुका सावंतवाडी रस्त्यासाठी २ कोटी ३८ लाख, लोरे गडमठ रस्ता तालुका वैभववाडी साठी १ कोटी ८९ लाख,निवजे ओझरवाडी ते बामणदेवी मुळदे खुटवळवाडी रस्ता तालुका कुडाळ साठी २ कोटी ७२ लाख असा १६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!