काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांकडून आंबेडकरी समाजाची दिशाभूल
समाजकल्याण सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांची टीका
कणकवलीत राहूल गांधी आणि काँग्रेस पक्षाला रॅलीतून देणार करारा जवाब
डॉ. बाबासाहेब आणि आंबेडकरी समाजावर बोलण्या इतकी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांची उंची नाही
कणकवली : गेली साठ सत्तर वर्षे काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी आंबेडकरी समाज आणि देशाची फसवणूक करत दिशाभूल केलेली आहे. सन 1980 मध्ये कुठलं आरक्षण काँग्रेस पक्षाने आरक्षित समाजाला दिले हे धूमकेतू प्रमाणे कधीतरी उगवणाऱ्या काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी जाहीर करावे. शिवाय आरक्षण बचाव रॅली ही महायुतीची आहे. ती आपल्याच बहुजन समाजाच्या विरोधात आम्ही काढत नाही आहोत तर राहूल गांधी यांना आणि काँग्रेस पक्षाला या रॅलीतून करारा जवाब देणार आहोत. त्यामुळे टेंबूलकर यांनी आपल्या बालिश विचारांची विषारी “किरणं ” समाजात पसरवू नये असे सडेतोड उत्तर माजी समाजकल्याण सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी दिले आहे.
काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष टेंबूलकर यांनी कणकवलीत होणाऱ्या महायुतीच्या आरक्षण बचाव रॅलीवर पत्रकार परिषद घेत टिका केली होती. त्याला माजी समाजकल्याण सभापती तथा भाजपा प्रवक्ते जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकातून जोरदार सडेतोड उत्तर दिले. जाधव म्हणाले, गेली साठ सत्तर वर्षे काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी आरक्षित समाजाचाची फसवणूक व दिशाफूल करत फक्त मतांच राजकारण केल. दलितांचे विकासाचे प्रश्न म्हणावे तसे सोडवेल नाहीत. ही आमची फसवणूक केली. भाजपा जातीयवादी आणि संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार असा खोटा प्रचार करून दलितांची मते मिळवीत आलात. परंतु आता देशातील जनतेला आणि दलित समाजाला काँग्रेसचे मतांचे राजकारण कळून चुकले आहेत. ते तुमच्या अशा प्रचाराला आता बळी पडणार नाहीत आणि पडत नाही. दलित मतदार काँग्रेस पक्षापासून दूर जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच मुंबई तील स्मारक, लंडन मधील घर, हे अस्मितेचे आणि जिव्हाळ्याचे प्रश्न भाजपा सत्तेत आल्यावर मार्गी लागले आहेत. का तुमच्या काँग्रेस पक्षाला शक्य झालं नाही. हे प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले होते कारण खरे जातीयवादी तुमचा पक्ष आहे हे आता दलित समाजाला समजले आहे. आणि हो आरक्षण बचाव रॅली ही काँग्रेस पक्ष आणि राहूल गांधी यांचा विरोधात आम्ही महायुती व आरक्षित समाज काढत आहोत. ही रॅली अलीकडे तुम्ही माहिती दिल्यानुसार आमच्याच समाजाला उत्तर देण्यासाठी नाही आहे. त्यांचे प्रश्न ते लोकशाही मार्गाने मांडू शकतात. त्याला आमचा विरोध असण्याचा प्रश्नच येत नाही. बेंच आणि आरक्षण बचाव रॅली हे दोन वेगळे विषय आहेत. आम्हीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारानां प्रमाण मानून काम करत आहोत. त्यामुळे टेंबूलकर यांनी नीट माहिती आणि अभ्यास करून बोलत जावं उगाचच विषारी किरण समाजात पसरवून तेढ निर्माण करून नये. शिवाय काँग्रेस ने हिंदू कोड बिलला विरोध,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. याचं दुःख आणि संताप बहुजन समाजात आजही आहे.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न 1988 साली आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 1971साली देण्यात आला. यातून काँग्रेस पक्षाची जातीयवादी भूमिका देशाने पहिली.आणि काँग्रेस ने 1980 ला कुठलं आरक्षण दिल होतं त्यांची माहिती पुरव्यासहित जाहीर करावं. आरक्षण फक्त आणि फक्त संविधान यातूनच मिळाल आहे हे लक्षात घ्या.
ही संविधान रॅली आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघात होणार आहे. मोठया संख्येने जनता सहभागी होऊन राहूल गांधी यांचा निषेध करणार आहे. टेंबूलकर यांच्या विधानाची जनता आणि बहुजन समाज दाखली घेणार नाही हे रॅलीतून दिसून येणार असल्याचे सांगत जाधव यांनी आरक्षित समाजाने आरक्षणला विरोध म्हणजेच आमचे मुक्ती दाते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना राहूल गांधी यांचा विरोध आहे हे सर्वांना कळून चुकले आहे. त्यामुळे रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन जाधव यांनी केले आहे.