कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना ; आ. वैभव नाईक यांनी सपत्नीक केले पूजन

मालवण : कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज घटस्थापने दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. देवीसाठी आकर्षक दरबार व देवीच्या आसनाला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

देवीची सवाद्य मिरवणूक कणकवली बाजारपेठेतून नरडवे फाटा नजीक असलेल्या शिवसेना नवरात्रोत्सव स्थळापर्यंत जल्लोषात काढण्यात आली.  दुर्गामातेचा जयजयकार करत, फटाक्यांची आतषबाजी करून ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांसह कणकवलीतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवीच्या आगमनाचा उत्साह साजरा करण्यात आला. आजपासून रविवार दि.१३ ऑक्टोबर पर्यंत देवीची नित्यपूजा, आरती, विविध सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनाचे कार्यक्रम व  उपक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यात  येणार आहे.

याप्रसंगी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, शिवसेना कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर व प्रथमेश सावंत,नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष रामदास विखाळे, खजिनदार विलास गुडेकर,जेष्ठ शिवसैनिक राजू शेटये,राजू राणे,सचिन सावंत, सतीश नाईक,बंडू ठाकूर,महेश कोदे,उत्तम लोके, संतोष परब, सचिन आचरेकर,रुपेश आमडोसकर, संजय पारकर, निसार शेख, महिला तालुकाप्रमुख वैदही गुडेकर, प्रतीक्षा साटम,दिव्या साळगावकर, माधवी दळवी, शितल बाणे, ललित घाडीगावकर, धिरज मेस्त्री सचिन खोचरे, अजित काणेकर, महेंद्र डिचोलकर,भालचंद्र दळवी,अरुण परब, बाबु केणी, लक्ष्मण हन्नीकोड,मिलिंद आईर, समीर परब,नंदकिशोर कोरगावकर, जगन्नाथ आजगावकर, नयन गावडे,नंदू परब आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक  मोठया संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!