मालवणातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५५ जणांचे रक्तदान
एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते मालवण यांचे आयोजन
मालवण : एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
ओरोस ब्लड बँक येथे रक्ताचा तुटवडा भासल्याने रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत बाजारपेठेतील देसाई बिल्डिंग येथे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन एकता मित्रमंडळाचे सदस्य माजी नगरसेवक उत्तम पेडणेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्षा शर्वरी पाटकर, डॉ.जुई देसाई, ऍड. ऋषी देसाई, राजा शंकरदास, सुधीर धुरी, उमेश सांगोडकर, अमेय देसाई, मंदार ओरोसकर आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वी होण्यासाठी एकता मित्रमंडळाचे विद्याधर मेस्त्री, हितेंद्र हिर्लोस्कर , राजू गिरकर, तुषार मेस्त्री, रोहित गरगट्टे, पपू वणकुद्रे, मिलिंद कडू, ललित मेस्त्री, किरण रेडकर, विवेक गरगट्टे, रवी गरगट्टे, सुनील गरगट्टे, चेतन हरमलकर, कुलराज बांदेकर अमित नाईक, केदार देसाई, अभी खानोलकर, किरण देसाई, आशा देसाई, ऋतुजा देसाई, करिश्मा देसाई , लिशा कडू, यथार्थ कडू, जुई गरगट्टे, अभी गरगट्टे, राजू कोवळे यांचे तसेच ग्लोबल रक्तदाते ,मालवण समूहाचे विजय पांचाळ, विकास पांचाळ, राजा शंकरदास, संदीप पेडणेकर तसेच ग्लोबल रक्तविरांगणा नेहा कोळंबकर (शंकरदास), राधा केरकर , पल्लवी तारी (खानोलकर), ऋषा पाटील आदींचे सहकार्य लाभले. तसेच ओरोस ब्लड बँकच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी सुरवसे, मयुरी शिंदे, नेहा परब, आदिनाथ राठोड, प्रथमेश घाडी, नंदकुमार आडकर, नितीन गावकर यांचे रक्तसंकलनासाठी सहकार्य लाभले. या शिबिरास माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच श्रीमती रजनी बेलवलकर यांनी आर्थिक सहकार्य केले. अमेय देसाई यांनी आभार मानले.