भाजपा किसान मोर्चाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी महेश सारंग यांची निवड

पक्षाचा विश्वास सार्थकी लावणार ; नूतन तालुकाध्यक्ष महेश सारंग यांची प्रतिक्रिया

कुणाल मांजरेकर

मालवण : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी महेश सारंग यांची निवड करण्यात आली आहे. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी ही निवड जाहीर केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते महेश सारंग यांना कुडाळ येथील बैठकीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे, सरचिटणीस प्रभाकर सावंत, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, उपाध्यक्ष किशोर नरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पक्षाचा विश्वास सार्थकी लावणार : महेश सारंग

आपल्या सारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष पद देऊन भाजपाने आपला सन्मान केला आहे. या पदा सोबत मिळालेल्या जबाबदारीचे भान ठेवून आगामी काळात भाजप पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या समस्या जाणून घेत त्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी प्रतिक्रिया महेश सारंग यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, सिंधुदुर्ग यांच्यावतीने मंडल अध्यक्ष किसान मोर्चा मालवण तालुका ही जबाबदारी आपल्यावर देत आहोत. भाजपा राज्यात व देशात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनलेला आहे. पक्षासाठी आगामी तीन वर्ष फार महत्त्वाची आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सहकार क्षेत्रातील निवडणुका या काळात होणार आहेत. प्रमुख पक्ष या नात्याने या सर्व निवडणुका जिंकणे हे ध्येय आपल्यासमोर आहे. भाजपाच्या संघटन पर्वात एक कोटीहून अधिक नागरिक राज्यात आपल्या पक्षाचे सदस्य आहेत. समाजाच्या सर्व घटकांशी आपला पक्ष जोडला गेलेला आहे. अनेक नवे लोक आपल्या पक्षात दाखल झाले आहेत. त्या सर्वांना घेऊन पुढे जायचे आहे. आशा आहे की आपला अनुभव आणि पक्षासाठी योगदान भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक वाढीसाठी भविष्यात अधिक महत्त्वपूर्ण ठरेल. पक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व संघटनात्मक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहा. शासनाच्या विविध योजनांची माहिती गावागावात पोहोचवून शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीचे काम राहील याकडे आपले लक्ष द्याल यात दुमत नाही. एक राजकीय इतिहास घडविण्यात घडविण्याच्या प्रक्रियेचे आपण घटक आहोत. पक्षाने आपल्यावर दिलेली जबाबदारी उत्साहाने पार पाडु, असे महेश सारंग यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!