शिधापत्रिका धारकांनी १५ नोव्हेंबर पर्यंत आधार नोंदणी आणि पडताळणी करावी ; अन्यथा…
महसूल विभागाचे आवाहन
कुणाल मांजरेकर
मालवण : दरमहाचे धान्याचे वितरण ई-पॉस मशिनदवारे पारदर्शकरित्या होण्यासाठी शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे आधार संगणकीकरण तातडीने करण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत धान्याचा लाभ मिळण्याकरीता शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सर्व सदस्यांची आधार नोंदणी (ईकेवायसी) व लाभार्थी पडताळणी (मेंबर व्हेरीफीकेशन) होणे आवश्यक आहे. त्याकरीता शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत संबंधित रास्तभाव धान्य दुकानात शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थी यांनी उपस्थित राहून आधार नोंदणी व मेंबर व्हेरीफीकेशन (लाभार्थी पडताळणी) करुन घेण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे. सदर मुदतीत शिधापत्रिकाधारक लाभार्थी यांनी आधार नोंदणी व मेंबर व्हेरीफीकेशन (लाभार्थी पडताळणी) करून न घेतल्यास अशा शिधापत्रिकाधारकास धान्य पुरवठा केला जाणार नाही. याकरीता मालवण तालुक्यातील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थी यांनी आपले रेशनकार्ड व आधारकार्ड सहीत रास्तभाव धान्य दुकानात उपस्थित राहून ई-पॉस मशिनदवारे आपले आधार नोंदणी व मॅबर व्हेरीफीकेशन (लाभार्थी पडताळणी) ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे, असे आवाहन तहसिलदार मालवण यांनी केले आहे.