घुमडाई मंदिरातील “श्रावणधारा” महोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आज तिसरे पुष्प 

जिल्ह्यातील नामांकित बुवांची देवी घुमडाई चरणी होणार भजनसेवा ; श्रावणी मंगळवार निमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील घुमडे येथे श्रावण मासानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते देवदत्त उर्फ दत्ता सामंत पुरस्कृत आणि घुमडे ग्रामस्थ मंडळ “श्रावणधारा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत भजन महर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृती प्रित्यर्थ नामांकित बुवांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा घुमडाई मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. या भजन स्पर्धेतील तिसरे पुष्प आज गुंफले  जाणार आहे. या निमित्त जिल्ह्यातील नामांकित बुवांची भजने देवी घुमडाई चरणी अर्पण होणार आहेत. तर सकाळी मंदिरात धार्मिक विधी आणि दुपारी महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.

मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी (बुवा विराज तांबे), सायंकाळी ६ वा. श्री देवी इस्वटी प्रासादिक भजन मंडळ मातोंड वेंगुर्ले (बुवा – सचिन सावंत), सायंकाळी ७ वा. श्री भगवती प्रासादिक भजन मंडळ बाव कुडाळ (बुवा लक्ष्मण नेवाळकर), रात्री ८ वा. श्री महापूरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी कुडाळ (बुवा प्रसाद आंबडोसकर) यांचे भजन होणार आहे. 

मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. श्री पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ फोंडाघाट कणकवली ( बुवा हेमंत तेली), सायंकाळी ६ वाजता श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ माजगाव सावंतवाडी (बुवा कुणाल वारंग), सायंकाळी ७ वा. श्री नादब्रम्ह प्रासादिक भजन मंडळ कसाल (बुवा सुंदर मेस्त्री), रात्री ८ वाजता श्री देवी माऊली प्रासादिक  भाजन सेवासंघ इन्सुली सावंतवाडी (बुवा वैभव राणे) यांची भजने होणार आहेत. गुरुवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद होणार असून सायंकाळी ७ वा. “भीषण स्वरूपी  राजयक्षमा” हा संयुक्त दशावतारांचा महान पौराणिक संघर्षमय दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांचा समावेश असेल. मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार असून सायंकाळी ७ वाजता “चिंतामणी जन्म” हा संयुक्त दशावताराचा महान पौराणिक संघर्ष मय दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. यामध्ये देखील दिग्गज कलाकारांचा भरणा आहे. तरी श्री देवी घुमडाई मंदिरात होणाऱ्या या मंगल धार्मिक सोहळ्यास भाविक व भजन श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!