मच्छिमार दुर्घटना : खा. नारायण राणे यांनी मृतांना वाहिली श्रद्धांजली

मृत मच्छिमार कुटुंबाची लवकरच भेट घेणार : खा. राणे 

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीसाठी गेलेली पात नौका आचरा हिर्लेवाडी येथील समुद्रात बुडून सर्जेकोट सोसायटीचे माजी अध्यक्ष जीजी आडकर यांच्यासह तीन मच्छिमारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत मच्छिमार कुटुंबाची मी लवकरच भेट घेणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

सर्जेकोट येथील जीजी आडकर हे आपली पात नौका घेऊन मासेमारी साठी गेले असता होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत त्यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला होता. याबाबत नारायण राणे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून पोस्ट करीत या मच्छीमारांना श्रद्धांजली वाहिली आहे. “मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीसाठी गेलेली पातनौका आचरा हिर्लेवाडी येथील समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत जीजी आडकर यांच्यासह तीन मच्छिमारांचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून तीव्र दुःख झाले. ही घटना अत्यंत दुःखद आहे. मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची परमेश्वराने शक्ती द्यावी ही प्रार्थना करतो. मी मृत मच्छीमार कुटुंबियांची लवकरच भेट घेईन” असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!