विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कुंभारमाठ येथे २५ ऑगस्टला भव्य हिंदू एकता मेळावा

मालवण : श्री राम मंदिराच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या विश्व हिंदू परिषदेला येत्या गोकुळाष्टमी दिवशी ६० वर्ष पूर्ण होत आहेत. याच औचित्त्यावर विश्व हिंदू परिषद, मालवणतर्फे रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता कुंभारमाठ, जानकी मंगल कार्यालय येथे भव्य हिंदू एकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने मालवण वासियांना धगधगत्या, प्रखर आणि ज्वलंत हिंदुत्वाचे विचार ऐकण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. तरी या मेळाव्याला तमाम हिंदू माता भगिनी आणि बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे..

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!