वडाचापाट येथे उद्या नारळ लढवण्याची स्पर्धा

भाजपा पुरस्कृत नवतरुण मित्रमंडळ वडाचापाट यांचे आयोजन

मालवण : मालवण तालुक्यातील वडाचापाट येथे नवतरुण मित्रमंडळाच्या वतीने उदया रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वा. नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा भाजपच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली आहे. देसाई दुकान वडाचा पाट शाळेजवळ ही स्पर्धा होणार आहे. 

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रोख ३००० रुपये (माजी सभापती राजेंद्र देसाई व उद्योजक दयानंद देसाई पुरस्कृत) व चषक ( सरपंच सोनिया प्रभुदेसाई पुरस्कृत) देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांकाला रोख २००० रुपये (माजी विस्तार अधिकारी अंकुश मुणगेकर पुरस्कृत) आणि चषक (उपसरपंच सचिन पाताडे पुरस्कृत) दिला जाणार आहे. स्पर्धेसाठी १०० रुपये प्रवेश फी असून या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3859

Leave a Reply

error: Content is protected !!