भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून १९ ऑगस्टला मालवणात महिलांची भव्य नारळ लढवण्याची स्पर्धा

विजेत्या महिलांवर रिफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, फॅन, सोन्याची नथ आणि अन्य बक्षीसांचा वर्षाव ; सहभागी प्रत्येक महिलेला मिळणार भेटवस्तू ; महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : भाजपा महिला शहर अध्यक्ष अन्वेशा आचरेकर यांचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

भारतीय जनता पार्टीचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण बंदर जेटीवर १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता महिलांची नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या महिलांवर रिफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, फॅन, सोन्याची नथ आणि अन्य बक्षीसांचा वर्षाव होणार असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकाला भेटवस्तू दिली जाणार आहे. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा महिला शहर अध्यक्ष अन्वेशा आचरेकर यांनी केले आहे.

मालवण भाजपा कार्यालयात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी माजी नगरसेविका ममता वराडकर, महानंदा खानोलकर, तालुका उपाध्यक्ष राणी पराडकर, शहर चिटणीस महिमा मयेकर, पूजा वेरलकर, तारका चव्हाण, अमिता निवेकर, तन्वी परब आदी उपस्थित होते. यावेळी अन्वेशा आचरेकर म्हणाल्या, निलेश राणे यांच्या माध्यमातून नारळी पौर्णिमेला मालवण बंदर जेटीवर भव्य दिव्य प्रमाणात नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पुरुष गटासाठी प्रथम क्रमांकाला तब्बल एक लाखांचे रोख पारितोषिक दिले जाणार असून इतर आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तर महिला गटासाठी फ्रिज, वॉशिंग मशीन, फॅन, सन्मानचिन्ह तसेच लकी ड्रॉ मध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना सोन्याची नथ, चांदीचा करंडा, छल्ला यांसह अन्य बक्षीसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकाला भेटवस्तू देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, नावनोंदणीसाठी महिला शहर अध्यक्ष अन्वेशा आचरेकर 8180986833, तन्वी परब 7588117805 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!