लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा ; मालवणात भाजपकडून आनंदोत्सव
पहिल्या लाभार्थ्यांच्या सन्मान ; योजनेच्या अंमल बजावणीवर टीका करणाऱ्या विरोधकांना चपराक ; शहर अध्यक्ष अन्वेशा आचरेकर यांची प्रतिक्रिया
मालवण | कुणाल मांजरेकर
राज्यातील महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन महिन्यांचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. याबद्दल मालवणात भाजपा महिला आघाडी कडून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मालवण मधील या योजनेतील पहिली लाभार्थी अर्पिता नरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या योजनेवर विरोधकांनी टीका करून ही योजना प्रत्यक्षात साकारणार नाही, असे दावे केले होते. मात्र राज्यात अनेकांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून विरोधकांचे दावे फोल ठरले आहेत, असे भाजपा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा अन्वेशा आचरेकर यांनी सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खा. नारायण राणे यांचे आभार मानले आहेत.
मालवण भाजपा कार्यालया बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके लावून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी नगराध्यक्षा सुदेश आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजू बिडये, आबा हडकर, नानाशेठ पारकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजा मांजरेकर, भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्ष अन्वेशा आचरेकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, महानंदा खानोलकर, तालुका उपाध्यक्ष राणी पराडकर, शहर चिटणीस महिमा मयेकर, पूजा वेरलकर, तारका चव्हाण, अमिता निवेकर, तन्वी परब आदी उपस्थित होते. यावेळी अन्वेशा आचरेकर यांच्या हस्ते अर्पिता नरे या महिला लाभार्थ्याचा सत्कार करण्यात आला. सौ. नरे यांनी महायुती सरकारचे आभार मानले.