“पंचायत समिती आपल्या दारी” चा २९ ऑक्टोबरला मठबुद्रुक येथे समारोप

सभापती अजिंक्य पाताडे यांची माहिती

मालवण : मालवण पंचायत समितीच्या वतीने गेले पंधरा दिवस राबवण्यात आलेल्या “पंचायत समिती आपल्या दारी” उपक्रमाचा समारोप शुक्रवारी २९ ऑक्टोबर रोजी मठबुद्रुक मध्ये होणार आहे, अशी माहीती सभापती अजिंक्य पाताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सभापती दालनात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी आदी उपस्थित होते. यावेळी सभापती पाताडे म्हणाले, १२ ऑक्टोबर पासून पंचायत समितीच्या वतीने नांदोस गावातून पंचायत समिती आपल्या दारी उपक्रम तालुक्यात सुरू करण्यात आला. या अंतर्गत तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी गावात जाऊन जनतेच्या अडीअडचणी समजावून घेत त्यांना मार्गदर्शन केले. तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती मतदार संघात हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा समारोप शुक्रवारी करण्यात येणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!