नगरसेवक दीपक पाटकर यांचं दातृत्व ; स्व खर्चातून बसवले तीन बेंचेस !

महापुरुष पार आणि ईस्वटी महापुरुष भाविकांसाठी व्यवस्था ; नागरिकांनी मानले आभार

कुणाल मांजरेकर

मालवण : आपल्या विविधांगी सेवाभावी कार्यामुळे प्रसिद्ध असलेल्या नगरसेवक दीपक पाटकर यांनी स्थानिक नागरिकांच्या मागणी नुसार शहरात स्व खर्चाने तीन बेंचेस बसवून दिले आहेत. शहरातील महापुरुष पार रेवतळे येथे एक तर ईस्वटी महापुरुष देउळवाडा येथे दोन बेंचेस बसवण्यात आले आहेत. याबद्दल स्थानिकांनी नगरसेवक दीपक पाटकर यांचे आभार मानले आहेत.

मालवण शहरात दीपक पाटकर यांची कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ओळख आहे. रेवतळे येथील महापुरुष पार येथील भाविकांच्या सोयीसाठी याठिकाणी बेंच बसवून देण्याची येथील नागरिकांची मागणी होती. तर देऊळवाडा येथील ईस्वटी देवस्थान कडे देखील बेंचेस बसवून देण्याची मागणी तेथील नागरिकांनी केली होती. त्यानुसार दीपक पाटकर यांनी स्वखर्चाने येथे बेंच उपलब्ध करून दिला आहे. तर ईस्वटी महापुरुष येथे देखील भाविकांसाठी बेंच बसवण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. त्या मागणीनुसार याठिकाणी देखील दोन बेंचेस श्री. पाटकर यांनी दिले आहेत. श्री. पाटकर यांच्या उपस्थितीत हे बेंचेस बसवण्यात आले.

नगरसेवक दीपक पाटकर यांनी स्वखर्चाने महापुरुष पार येथील महापुरुष बालगोपाळ मित्रमंडळाला दिलेला बेंच

यावेळी नगरसेवक जगदीश गावकर, बाळू मालवणकर, संतोष इब्रामपूरकर यांच्यासह महापुरुष बाळ गोपाळ मित्रमंडळाचे रमेश गावकर, सुधीर हळदणकर, राजन गावकर, मंगेश आरोंदेकर, राजू साळवी, श्री. राणे, राजा कारेकर, संतोष गावकर, श्री. पाटकर, दादा मांजरेकर, श्री. गवंडे, ईस्वटी देवस्थान मित्रमंडळाचे उमेश चव्हाण, किरण चव्हाण, श्यामा आजगावकर, अर्जुन चव्हाण, गणेश चव्हाण, आप्पा चव्हाण, गुरू मुंबरकर, राजू किर, श्री. माणगावकर, समीर चव्हाण तसेच अन्य नागरिक उपस्थित होते. दीपक पाटकर यांच्या दातृत्वाचे नागरिकांनी कौतुक करत आभार मानले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!