काळबादेवी मंदिराच्या रस्त्याची तात्काळ डागडुजी ; दीपक पाटकर यांची तत्परता
उद्या होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने दुरुस्ती ; नागरिकांनी मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील काळबादेबी मंदिराचा श्रावण महिन्यात होणारा जत्रोत्सव उद्या (मंगळवारी) साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील समस्याग्रस्त रस्त्याची पालिकेच्या वतीने तात्काळ डागडुजी करण्यात आली. या कामासाठी भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी पाठपुरावा केला. याबद्दल येथील नागरिकांनी श्री. पाटकर यंच्याबरोबरच पालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.
शहरातील काळबादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता चिखलमय बनला होता. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत होती. श्रावण मंगळवारी काळबादेवीचा जत्रोत्सव होत असल्याने भाविकांना याचा त्रास होणार असल्याने ही बाब दीपक पाटकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे लक्ष वेधले. पालिकेचे मंदार केळूसकर आणि सहकाऱ्यांनी हा रस्ता तातडीने दुरुस्त केला आहे. त्यामुळे येथील स्थानिकांनी आभार मानले आहेत. दरम्यान, सातेरी मंदिराकडील रस्त्यावरील खड्डे देखील श्री पाटकर यांनी बुजवले होते. त्यांच्या या तत्परते बद्दल कौतुक होत आहे.