शिवसेना ठाकरे गटाकडून संजय पडते, मंदार केणी यांच्याकडे नव्या जबाबदाऱ्या
संजय पडते कुडाळ मालवणचे जिल्हाप्रमुख तर मंदार केणी यांची जिल्हा प्रवक्तेपदी नेमणूक
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या पुन्हा नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कुडाळ मालवण मतदारसंघाचा स्वतंत्र कार्यभार त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे. तर मालवण येथील माजी नगरसेवक मंदार केणी यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसेना प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले आहे.