सिंधुदुर्गात उद्यापासून ऑफलाईन स्वरूपात धान्य मिळणार; पालकमंत्र्यांच्या “ओएसडीं” समवेतच्या बैठकीत निर्णय

भाजपा नेते निलेश राणेंच्या प्रयत्नातून मालवण तालुका धान्य दुकानदार संघटनेची बैठक

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली बैठक ; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची उपस्थिती 

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मालवण तालुका धान्य दुकानदार संघटनेची बैठक पालकमंत्र्यांचे ओएसडी श्री. साखरे यांच्या समवेत बुधवारी सायंकाळी घेण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे धान्य वितरणातील अडचणी मांडण्यात आल्या. यामध्ये मालवण तालुक्यासह जिल्ह्यात ऑनलाईन स्वरूपात धान्य वितरणात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगून जिल्ह्यात ऑफलाईन स्वरूपात धान्य वितरणास मंजुरी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार या संदर्भातील तांत्रिक बाबींची पूर्तता करून जुलै महिन्याचे धान्य ऑफलाईन स्वरूपात वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार उद्यापासून दोन दिवस जुलै महिन्याचे धान्य ऑफलाईन स्वरूपात दिले जाणार आहे. दरम्यान, सप्टेंबरच्या ९ तारखेला गणेश चतुर्थी असल्याने ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट व सप्टेंबर चे धान्य वितरीत करण्याची मागणी करण्यात आली. त्याबाबत प्रयत्न करण्याची ग्वाही देण्यात आली.

या बैठकीला मालवण तालुका धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अमित गावडे, बाळू कुबल, बाबू लुडबे, सुभाष गिरकर, श्री. पांजरी यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

जुलै महिन्याचेच धान्य ऑफलाईन

या बैठकीत सध्या असलेल्या अडचणींमुळे जुलै महिन्याचेच धान्य ऑफलाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट मध्ये ऑनलाईन पद्धतीनेच धान्य मिळणार असून सप्टेंबर महिन्याचे धान्य देखील गणेश चतुर्थीमुळे ऑगस्ट मध्येच मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3845

Leave a Reply

error: Content is protected !!