खा. सुरेश प्रभू यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट !

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक विषयांवर चर्चा

कुणाल मांजरेकर

माजी केंद्रीयमंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधानांच्या निमंत्रणा वरून ही भेट झाली असून या भेटीत पंतप्रधानांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व सांस्कृतिक  स्तरावरील अनेक मुद्यावर दृष्टीकोन समजून घेता आला, अशी प्रतिक्रिया खा. प्रभूंनी दिली आहे.


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी फोन करून खा. सुरेश प्रभू व त्यांच्या कुटुंबीयांना भेटीचे निमंत्रण दिले होते. या भेटीबाबत खा. प्रभू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या कौटुंबिक परंपरेप्रमाणे व भारतीय संस्कृतीनुसार आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नजिकचा प्रकाशाचा उत्सव दीपावलीच्या शुभेच्छा देण्याकरीता भेट घेतली. त्यांची भेट हा आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने आनंदाचा, भाग्याचा क्षण असून मौल्यवान ठेवा आहे. नरेंद्र मोदी यांचेशी झालेल्या संवादातून त्यांचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व सांस्कृतिक  स्तरावरील अनेक मुद्यावर  दृष्टीकोन समजून घेता आला. ज्यामुळे आम्हाला अधिक समृद्ध होता आले हे विशेष. असे क्षण आयुष्यात खूप काही शिकवून जातात, असं खा. प्रभूंनी म्हटलं आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!