तालुकास्तरीय फ्री स्टाईल कुस्तीत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश
६५ किलो वजनी गटात मिथिलेश खराडे, ७० किलो वजनी गटात निशान शिरोडकर प्रथम
मालवण : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने वायरी येथील रेकोबा हायस्कूल येथे झालेल्या १९ वर्षाखालील मुले फ्री स्टाईल कुस्ती या क्रीडा प्रकारात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा मिथिलेश रविंद्र खराडे याने ६५ किलो वजनी गटात तर निशान नितीन शिरोडकर याने ७० किलो वजनी गटात तालुका स्तरावर प्रथम स्थान पटकावले आहे. या दोघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक प्रा. हसन खान यांचे मार्गदर्शन मिळाले.