बिळवसच्या सातेरी देवी समोर भाजप नेते निलेश राणे झाले नतमस्तक !
जत्रोत्सवानिमित्त घेतले दर्शन ; निलेश राणे आमदार होऊन मंत्री बनण्यासाठी ग्रामस्थांनी देवीला घातले साकडे
मालवण : तालुक्यातील बिळवस येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव आज संपन्न होत आहे. या जत्रोत्सवानिमित्ताने भाजपाचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निलेश राणे यांनी मंदिराला भेट देऊन ते सातेरी देवीसमोर नतमस्तक झाले. निलेश राणे आमदार होऊन मंत्री होऊ दे असे साकडे यावेळी घालण्यात आले. यावेळी मंडळाच्या वतीने निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. जत्रोत्सवानिमित्ताने निलेश राणे यांनी मंदिराला एक लाखाची देणगी सुपूर्द केली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरोज परब, सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, संतोष गावकर, नांदोस उपसरपंच विजय निकम, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राकेश सावंत, संतोष पालव यासह अन्य उपस्थित होते.