भाजपा नेते निलेश राणेंच्या दातृत्वाचा पुन्हा प्रत्यय
चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या त्रिंबक येथील गावडे कुटुंबियाला तात्काळ मदत सुपूर्द
मालवण | कुणाल मांजरेकर
भारतीय जनता पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभा संयोजक, माजी खासदार निलेश राणे यांच्या दातृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. मालवण तालुक्यातील त्रिंबक व लगतच्या परिसराला सोमवारी सायंकाळी चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये येथील गावडे कुटूंबाच्या घराचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच भाजपा नेते निलेश राणे यांनी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या माध्यमातून गावडे कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत केली आहे.
मंगळवारी त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर याच्या हस्ते तारामती गावडे यांना ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, पळसंब सरपंच महेश वरक, दिपक सुर्वे, संतोष गावकर, त्रिंबक उपसरपंच आशिष बागवे, सदस्य सौ. सपना तेली, नेहा, सुचिता, संतोषी, रोहित, पो. पाटील सकपाळ ग्रामसेवक कामतेकर, बाळा साटम, संतोष घाडीगांवकर, शेखर सुतार तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.