हिवाळे गावातील नुकसानग्रस्तांना भाजपा नेते निलेश राणे यांनी दिला मदतीचा हात
आर्थिक मदती बरोबरच तीन कुटुंबाना फ्रिज देऊन केली मदत ; नुकसानग्रस्तांनी मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील हिवाळे गावात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने दुकान, घरे यात पाणी घुसून मोठे नुकसान झाले होते. या कुटुंबियांना भाजपा नेते निलेश राणे यांनी मदतीचा हात दिला आहे. या कुटुंबाना आर्थिक मदत तसेच ज्यांचे अधिक प्रमाणात नुकसान झाले अशा तीन कुटुंबियांना फ्रिज देऊन मदत करण्यात आली आहे.
हिवाळे ग्रामपंचायत कार्यालय येथे नुकसानग्रस्ताना ही मदत प्रदान करण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजु परुळेकर, सरपंच रघुनाथ धुरी, संतोष गावकर, माजी सरपंच विश्वास परब, नयन कुलकर्णी, भाई पवार, पांडुरंग धुरी, विश्वनाथ परब, अरुण परब, संपद गावडे, राजेंद्र परब, भाई घाडीगावकर, यांसह ग्रामसेवक सुनील मळगावकर, ग्रामपंचायत सदस्य सानिका सावंत, कर्मचारी निलेश पवार, नूतन परब यांसह अन्य उपस्थित होते. घरात आणि दुकानात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले अरुण धुरी, अभि चव्हाण, राजेंद्र हिवाळेकर यांना फ्रिज भेट देण्यात आला. तर सतीश चव्हाण, रमेश राठोड, शत्रुघ्न पवार या नुकसानग्रस्त कुटुंबाना रोख स्वरूपात आर्थिक मदत करण्यात आली.