कै. शैला शंकर गावकर यांच्या स्मरणार्थ चिंदर मधील गावकर कुटुंबियांकडून टोपीवाला हायस्कुलला ३ लाखांची मदत
व्याजाच्या रक्कमेतून दरवर्षी प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना होणार सायकलचे वाटप ; यंदाच्या वर्षी ३ ऑगस्टला चार सायकलींचे वितरण
मालवण : कुणाल मांजरेकर
मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कुल मालवणच्या माजी विद्यार्थिनी कै. शैला शंकर गांवकर यांच्या स्मरणार्थ चिंदर मधील गांवकर कुटुंबियांच्या वतीने उद्योजक केदार गांवकर यांनी प्रशालेस तीन लाख देणगी स्वरूपात दिले आहेत. या रक्कमेतील २ लाख ७५ हजार रक्कम प्रशाला बँकेत ठेव स्वरूपात ठेवणार असून त्यातून मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना सायकल वितरित केली जाणार आहे. यावर्षी ३ ऑगस्ट रोजी कै. शैला गांवकर यांच्या जन्मदिन निमित्ताने २५ हजार रक्कमेतून चार गरजू विद्यार्थ्यांना सायकल वितरित केली जाणार आहे.
यावेळी मालवण एज्युकेशन सोसायटी संस्था चालक डी. व्ही. सामंत, जी. व्ही. सामंत, संस्था सेक्रेटरी विजय कामत यांसह भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाऊ सामंत, महेश मांजरेकर, योगेश गावकर, संतोष गांवकर, सुबोध गांवकर, अनिल तेरसे यांसह अन्य उपस्थित उपस्थित होते.