रेवतळेमध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
शिवसेना ठाकरे गट आणि महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने आयोजन
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मालवण शहर व महापुरुष मित्रमंडळ, रेवतळे यांच्यावतीने रेवतळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी पार पडले. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून एकूण ३० संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा एक गाव, एक संघ या स्वरूपात खेळविली जाणार आहे.
स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, उमेश मांजरेकर, अमेय मांजरेकर, उमेश चव्हाण, अनंत पाटकर, दत्ता पोईपकर, लारा देसाई, पायस अल्मेडा, डॅनिस फर्नांडिस आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे श्रीफळ वाढवून औपचारिक उद्घाटन करण्यात आले.