गोळवण कुमामे येथील नैसर्गिक आपदग्रस्ताला शिवसेना ठाकरे गटाकडून मदतीचा हात
आ. वैभव नाईक यांच्या बरोबरच युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, उद्योजक पराग नार्वेकर यांचे दातृत्व
पोईप | प्रसाद परब
मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे येथील राजेंद्र जयवंत घाडीगांवकर यांनी घरासमोर गणपती कारखान्यासाठी बांधलेली पत्राशेड मुसळधार पावसामुळे कोसळल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली. तसेच पोईप येथील युवासेना उप जिल्हाप्रमुख पंकज वर्दम, उद्योजक पराग नार्वेकर यांनी सुद्धा आर्थिक मदत केली आहे.
राजकारणाबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला विविध मार्गांनी आम्ही मदत करत असतो, असे पंकज वर्दम यांनी सांगितले. यावेळी विभागप्रमुख विजय पालव, गोळवण कुमामे विभाग प्रमुख भाऊ चव्हाण, पोईप शाखाप्रमुख अनिल येरम, शिवरामपंत पालव, गोळवण कुमामे शाखाप्रमुख गणेश मुणगेकर, संदिप नाईक, आदी लाड, जयवंत घाडीगांवकर, मोहन घाडीगांवकर, संतोष घाडीगांवकर, गुरूदास घाडीगांवकर उपस्थित होते. यावेळी साईगणेश आर्टचे मुर्तीकार राजेंद्र घाडीगांवकर यांनी आ. वैभव नाईक तसेच पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.