फोंडाघाट उद्यापासून अवजड वाहनांसाठी खुला

सिंधुदुर्ग दि १२ (जिमाका) देवगड निपाणी रस्ता राज्य मार्ग क्र १७८ वरील ४० वर्षापूर्वीची मोरी खचल्याने ९ जुलै ते १२ जुलै दरम्यान घाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मोरी दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असल्याने राज्य मार्ग क्र १७८ वरील अवजड वाहनांची एकेरी वाहतूक व देवगड निपाणी रस्ता राज्य मार्ग १७८ वरील फोंडाघाट येथील अवजड वाहनांची वाहतूक १३ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सुरू करण्यास हरकत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी कळविले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!