स्वतःमधील कमतरता दूर करून करिअर संधीचा फायदा घ्या

गाबीत समाजाच्या वतीने आयोजित गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात रमण पाटील यांचे आवाहन

मालवण : गाबीत समाज हा डॅशिंग समाज म्हणून ओळखला जातो. गाबीत समाजातील मुलांमध्ये अनेक कला कौशल्ये आहेत. आपल्यातील ही कौशल्ये व ताकद ओळखून ती मजबूत करा, स्वतःमधील कमतरता दूर करा आणि करियर संधीचा फायदा घ्या, असे प्रतिपादन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबईचे उपसंचालक रमण पाटील यांनी येथे बोलताना केले. 

दहावी आणि बारावी परीक्षा २०२३-२४ तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील गाबीत समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मालवण धुरीवाडा येथील संस्कार हॉल मध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबईचे उपसंचालक रमण पाटील, गाबीत समाज जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, जिल्हा कार्याध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा सचिव महेंद्र पराडकर, मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, उपाध्यक्ष सौ. अन्वेषा आचरेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाबी जोगी, देवबाग हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. रचना खोबरेकर, नारायण पराडकर, सौ. शिर्सेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचे व पालकांचे स्वागत करण्यात आले. रमण पाटील यांचा डॉ. कोळंबकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांना प्रशस्तीपत्र व गाबीत गौरव प्रतिमा देऊन गौरविण्यात आले. तसेच दहावी, बारावी व शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या मुलांना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी रमण पाटील यांनी मार्गदर्शन करताना आज भारताकडे काम करू शकणारे मनुष्यबळ जास्त आहे, जगही नोकऱ्यांसाठी आवश्यक मनुष्यबळासाठी भारताकडे पाहत आहे. त्यामुळे या संधीचा फायदा मुलांनी घेतला पाहिजे. मोबाईलचा वापर कमी करून पुस्तकांचे वाचन मुलांनी वाढविले पाहिजे, असे सांगितले. यावेळी चंद्रशेखर उपरकर यांनी गाबीत समाजातील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा गुणगौरव कार्यक्रम आम्ही घेत असून विद्यार्थ्यांनी शिक्षणात जास्तीत जास्त प्राविण्य मिळवावे, असे सांगितले. 

यावेळी बाबा मोंडकर, सौ. रचना खोबरेकर  डॉ. प्रमोद कोळंबकर, नारायण पराडकर यांनीही विचार मांडत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन महेंद्र पराडकर यांनी केले. आभार नारायण पराडकर यांनी मानले. यावेळी सहदेव साळगावकर, मिथुन मालंडकर, दिक्षा ढोके, पूजा सरकारे, राधिका कुबल, अनिल कुबल, रुपेश खोबरेकर, सुर्वी लोणे, माधुरी प्रभू, अनुष्का मालंडकर, निनाक्षी मेतर, नरेश हुले, भूषण मेतर, आनंद खडपकर, दादा वाघ आदी तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!