“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त महिला, भगिनींनी लाभ घ्यावा
युवतीसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सौ. सोनाली पाटकर यांचे आवाहन ; युवती सेनेकडून सर्वतोपरी सहकार्य
मालवण : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार गोरगरीब जनतेचे हक्काचे सरकार आहे. जनहिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवणाऱ्या या सरकारने महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी नव्याने घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य युवतीसेनेच्या माध्यमातून केले जाईल, अशी ग्वाही युवती सेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सौ. सोनाली पाटकर यांनी केले आहे.
या योजनेचा शासन निर्णय देखील पारित करण्यात आला आहे. योजेनेसाठी महाराष्ट्रातील महिला भगिनी यांची वयोमर्यादा ही २१ वर्ष ते ६० वर्षापर्यंत आहे. योजनेसाठी विवाहित महिला, विधवा महिला, निराधार महिला, परितक्त्या महिला, घटस्फोटित महिला या योजनेसाठी १ जुलै पासून १५ जुलै पर्यंत अर्ज करू शकतात. या योजनेसाठी पात्र महिलांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना ऑनलाईन अर्ज, लाभार्थी महिलेचे आधार कार्ड,अधिवास प्रमाणपत्र/ जन्म दाखला,कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न २. ५० लाखापर्यंत असणे आवश्यक), बँक खाते पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे हमीपत्र या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी मोबा 7498698449 या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन असे आवाहन युवती सेना जिल्हाप्रमुख सौ. सोनाली पाटकर यांनी केले आहे.