सावधान… मालवणच्या भाजी मंडईचा स्लॅब कोसळतोय ; युवासेनेने वेधले लक्ष !

भाजी विक्रेते मृत्युच्या छायेत ; नगरपालिका प्रशासन कोणाच्या मृत्युची वाट पाहतंय का ? मंदार ओरसकर यांचा सवाल 

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपालिकेच्या भाजी मंडईचे नूतनीकरण करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून हे काम सुरूच आहे. दरम्यानच्या काळात याठिकाणची जुनी इमारत धोकादायक बनली असून या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळू लागला आहे. ठाकरे गटाच्या युवासेना व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या धोकादायक परिस्थितीकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या इमारतीच्या खाली काही भाजी विक्रेते व्यवसाय करतात. त्यांचा जीव धोक्यात आला असून नगरपालिका प्रशासन कोणाच्या मृत्युची वाट पाहतंय का ? असा सवाल युवासेनेचे तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांनी केला आहे.

मालवण नगरपालिकेच्या वतीने भाजी मंडईचे नूतनीकरण हाती घेण्यात आले आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून हे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. त्यामुळे येथील व्यवसायिकांचे देखील नुकसान होत आहे. दरम्यान, येथील जुन्या इमारतीचा भाग कमकुवत झाला असून आठवड्याभरापूर्वी त्याची पडदी कोसळल्याची घटना घडली. या इमारतीच्या खाली काही भाजी विक्रेते व्यवसाय करतात. सुदैवाने यावेळी कोणाला दुखापत झाली आहे. शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, सन्मेश परब, किरण वाळके, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, करण खडपे, सिद्धेश मांजरेकर आदी उपस्थित होते. सदरील घटना गंभीर असून पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी मंदार ओरसकर यांनी केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!