त्यांच्या’ मुळे अपघातग्रस्त बालकास मिळाले वैद्यकीय उपचार!

मसुरे | झुंजार पेडणेकर

कणकवली आचरा रोडवर आडवली तीठा येथे अपघातग्रस्त बालकास वेळीच वैधकीय उपचार उपलब्ध करून दिल्याबद्दल आचरा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय उर्फ बाबू कदम यांचे कौतुक होत आहे.


बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास आडवली तिठया नजीक चार वर्षाचा मुलगा अकस्मात टेंम्पोच्या समोर आल्याने टेंम्पोची धडक बसून जखमी झाला. टेम्पो चालकाने प्रसंगावधान राखत गाडीचा वेग कमी केल्याने मोठा अनर्थ टाळला. याचवेळी आचरा येथील सामाजीक कार्यकर्ते विजय ऊर्फ बाबु कदम हे कणकवली येथे जाण्यास निघाले होते. अपघात झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी त्या जखमी मुलाला डाॅ. सिध्देश सकपाळ यांच्या दवाखान्यात नेऊन त्या मुलावर ताबडतोब उपचार केले.व वेळीच वैधकीय मदत मिळवून दिली. आचरा तिठा येथील बाबू कदम हे वेळी अवेळी कधीही मदतीसाठी तत्पर असतात.यावेळी बाबू कदम यांना टेंपोचालक व आडवलीचे सामाजीक कार्यकर्ते दुर्गाप्रसाद तुळपुळे यांचे मोठे सहकार्य लाभले. बाबू कदम यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाबद्दल कौतुक होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!