आडवली जमीन गैरव्यवहार व आर्थिक फसवणुक प्रकरण : न्यायालयीन कोठडीतील आरोपीची सशर्त जामीनावर मुक्तता
आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई आणि ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले
मालवण : आडवली घाडीवाडी येथील त्रयस्थ व्यक्तीच्या मालकीची जमीन स्वतः मालकीची असल्याचे भासवून व तसा नावाचा खोटा सातबारा तयार करून बनावट सातबाराच्या आधारे फिर्यादीस मे. दुय्य्म निबंधक कार्यालयात साठेकरार लिहून देऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचे कामी आडवली ता. मालवण येथील आरोपी क्र. 1 विनोद विवेक लाड वय 44 वर्षे याची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी रक्कम रु 15,000/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.
आडवली घाडीवाडी येथील जमीन मिळकत विकत घेऊन देतो असे आश्वासन देऊन आरोपी क्र 1 याने फिर्यादीकडून पैसै घेतले व त्यानंतर आरोपी क्र. 1 व 2 यांनी संगनमताने बनावट सातबाराच्या आधारे फिर्यादीस मे. दुय्यम निबंधक मालवण यांचेकडे साठेखत लिहून दिले व त्यानंतर फिर्यादीस ही फसवणूक लक्षात आल्यावर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार दि. 29/09/2023 रोजी आचरा पोलिस ठाण्यात भा. दं. वि. कलम 420, 467, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये आरोपी क्र 1 यास दि. 17/05/2024 रोजी अटक करून मे. न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने दि. 20/05/2024 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपीस मे. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर आरोपीतर्फे दाखल करण्यात आलेला जामीन अर्जाचे सुनावणीअंती दि. 05/06/2024 रोजी मे. मालवण न्यायालयाने आरोपीची रक्कम रु. 15,000/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली.