कार्यसम्राट मा. नगरसेवक दीपक पाटकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

आमदार कालिदास कोळंबकर, भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती : अशोक तोडणकर, प्रशांत बिरमोळे यांचाही वाढदिवस साजरा

मालवण | कुणाल मांजरेकर

भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा वाढदिवस रविवारी आमदार कालिदास कोळंबकर, भाजपाचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात साजरा करण्यात आला. दरम्यान, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, पोलीस पाटील प्रशांत बिरमोळे यांचा वाढदिवस काल (शनिवारी) झाला. त्यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, महेश सारंग, आबा हडकर, मंदार लुडबे, ललित चव्हाण, राजू बिडये, भाई मांजरेकर, निनाद बादेकर, परशुराम पाटकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!